Breaking News

विकेंड लॉक डाऊन नंतर धारूर शहरात तोबा गर्दी


किल्लेधारूर
:  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे विकेंड लॉक डाऊन च्या नंतर पहिल्या दिवस त्यात गुढीपाडवाचा अर्थात मराठी वर्णन वर्षाचा पहिल्या दिवशी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी किल्लेधारूर च्या बाजारात नागरिकांचे आज करोना निर्बंध पायदळी तुडवीत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आणि कोरोना कसा हटवणार असा प्रश्न प्रशासनापुढे आता निर्माण झाला आहे. 

           साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचा मराठी नव वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले होते त्यावेळी हिंदू बांधव घरापुढे तिची पूजा करतात अशाच प्रघात श्रीराम काळापासून चालत आलेल्या गुढी पूजनासाठी लागणाऱ्या साखरेचे हारकडे  खरेदीसाठी सोबत मधून गोड पदार्थ बासुंदी गुलाबजामुन श्रीखंड खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती 15 एप्रिल नंतर कडक लॉकडाऊन लागेल या भीतीने नागरिकांनी किराणा व इतर सामानाची खरेदी होत होती असे चित्र बाजारपेठ दिसताना सर्व व्यापाऱ्यांनी  दुकाने बंद होती. 


केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु होती शेतकऱ्यांनि भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणल्या गर्दी झाली होती पण नगर परिषद प्रशासन ने सामाजिक संस्था मदतीने योग्य नियोजन करून त्याना व्यवस्थित जागा देत गर्दी चे प्रमाणात काही प्रमाणात कमी केले असे असताना मात्र नागरिक मध्ये कोरोना बद्दल गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा आजच्या गर्दी वरून अधोरेखित झाले चे चित्र दिसत होते.

No comments