Breaking News

आष्टीत सोनाली येवले यांच्याकडून पत्रकारांना मास्क सॅनिटायझर वाटप

के. के. निकाळजे । आष्टी 

कोरोनाव्हायरस चे संक्रमण हे राष्ट्रावर आलेली फार मोठी आपत्ती असून ही आपत्ती आता सर्व लोकांनी दूर करण्याचे ठरवले असून शासनावर विसंबून न राहता आपणही शासनाला थोडासा खारीचा वाटा देत मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक दानशूर सरसावले त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटोदा तालुका उपाध्यक्ष सोनाली येवले यांनीही आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून आष्टी येथील पत्रकारांना मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.


पत्रकार हे कोरोना संक्रमण काळात २४ तास स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना मेहनत करून वार्तांकन पोहचवत असतात आपलं कर्तव्य बजावताना या टोकाकडून त्या टोकाकडे धाव घेताना दिसत आहेत.कर्तव्य बजावताना त्यांच्याकडून आरोग्याकडे अनपेक्षितपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे, नागरिकांसाठी सेवा देणाऱ्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य असल्याचं सांगत,राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष सोनाली येवले यांनी दि.२१ रोजी आष्टी येथे पत्रकार बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले,यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,सचिव अविशांत कुमकर,जावेद पठाण,शरद रेडेकर,यशवंत हंबर्डे,मनोज पोकळे,किशोर निकाळजे,अक्षय विधाते,अण्णासाहेब साबळे आदी उपस्थित होते.

No comments