Breaking News

पत्रकार विजयराज आरकडे यांचा सत्कार


गौतम बचुटे । केज

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्षपदी विजयराज आरकडे यांची निवड झाल्याबद्दल आदर्श पत्रकार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या बाबतची माहिती अशी की, आदर्श पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार विजयराज आरकडे यांची मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी समितीचे विश्वस्त मा. एस एम देशमुख, बापूसाहेब गोरे, प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, अधिस्वीकृती समिती सदस्य अनिल वाघमारे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे यांनी त्यांची बीड जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. 

त्या निमित्त दि. ४ एप्रिल रविवार रोजी केज येथील शासकीय विश्रामगृहावर आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, दशरथ चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कारचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभ प्रसंगी सचिव गौतम बचुटे उपाध्यक्ष महादेव काळे आदी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष विजयराज आरकडे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.  या वेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष विजय आरकडे यांनी सर्व पत्रकारांच्यामध्ये समन्वय ठेवून मा. एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

No comments