Breaking News

राज्य परिवहन विभाग नियंत्रकाचे आगार व्यवस्थापकांना प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश-- डॉक्टर ढवळे

आष्टी : शासकीय कार्यालय तसेच बस स्थानक आवारातील पानपोई कोरड्याठाक पडल्या असून उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असून आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना हे परवडणारे नसल्याने या मोफत पानपोई सुरू करण्यात याव्यात अशी लेखी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी तसेच  विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती. 

तसेच याविषयी विविध दैनिकातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवेदनाची दखल घेऊन विभाग नियंत्रक रा प बीड यांनी सर्व आगार व्यवस्थापक  गेवराई ,  माजलगाव ,  परळी ,  अंबाजोगाई ,  धारूर ,  पाटोदा ,  आष्टी यांना सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आपल्या अखत्यारीत असलेली बस स्थानकावर प्रवाशांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकरता समाज सेवक ,  समाज सेवी संस्था ,  सेवा भावी संस्था व आपल्या मार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे लेखी कळवले आहे. 

No comments