Breaking News

राजुरी - चिंचपुर रस्त्याचे काम बंद; अर्धवट आणि धिम्या गतीच्या कामामुळे नागरीकांना होतोय ञास !

प्रतिकात्मक

लवकर काम पुर्ण करण्याची वाहनधारकांसह नागरिकांची मागणी!

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार 

बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेला राजुरी नवगण ते चिंचपुर या सुमारे 45 किलोमिटर अंतराचे रस्त्याचे काम हे मोठ्या गतीने सुरु आसतानाच संबधित गुत्तेदाराचे कामाचे रेट कमी केल्याने हे काम बंद अवस्थेत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्याचा मोठया प्रमाणावर त्रास सहन करत तारेवरची कसरत करावी लागत आहे , तर रस्त्यामधील गावातील नागरीकांना धुळीचा नाहक ञास सहन करावा लागत आहे.त्यामुळे काम हे कधी पुर्ण होईल आणि या धुळीपासुन कधी सुटका होईल असे म्हणण्याची वेळ प्रत्येक गावातील नागरिकावंर आली आहे.

बीडवरुन नगरला जाण्यासाठी हा रस्ता जवळ आहे पंरतु रस्त्याचे काम नसल्यामुळे या मार्गावरुन वाहतुक कमी होत आहे.माञ राजुरी नवगण ते चिंचपुर हा रोड झाल्यामुळे नगरला जाण्यासाठी हा सगळ्यात सोईस्कर मार्ग ठारणार आहे.माञ याच रोडचे काम धिम्या गतीने चालु आसल्यामुळे नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे.

या रस्त्यावर धार्मिक स्थळे!

बीड वरून नगरला जाण्यासाठी रायमोह शिरूर , पाथर्डी हा जवळचा मार्ग म्हणुन सर्वसुपरिचित आहे. या रस्त्यावर राजुरी येथील गणपती , रायमोहा जवळील जालिंदर नाथ , पाथर्डी मधील मोहटादेवी तर मढी येथिल कानिफनाथ हे धार्मिक स्थळे आहेत.या रस्त्याने वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अंत्यत महत्वाचा मानला जात आहे.

....तर याच मुळे अपघात!

राजुरी नवगण ते चिंचपुर या सुमारे 45 किलोमिटर अंतराचे काम दोन-तीन वर्षापासून धिम्या गतीने चालू असल्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.तसेच या रस्त्यावर होत असलेले अपघात देखील याच कारणामुळे होत आहेत त्यामुळे हे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.

- बाळासाहेब बोराडे ,

सामाजिक कार्यकर्ते शिरूर कासार

.....भविष्यात मणके जाऊन आधु होण्याची शक्यता?

राजुरी - चिंचपूर या रस्त्याचे काम चालू असताना अचानक बंद पडले आहे तसेच अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम चालू आहे नागरिकांना शिरूर ते बीड जाण्यासाठी तब्बल दोन तास लागतात तर बीड होऊन रात्रीच्या वेळी परत येण्यासाठी खूप अडचण येते तसेच रस्त्यात टाकलेल्या ढिगाऱ्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्यावर जाऊन पडतात यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवास करणे म्हणजेच तारेवरची कसरत झाली आहे जर अशाच संथ गतीने काम चालू राहिले तर दुचाकीवर प्रवास करणार्‍या नागरिकांचे मनके जाऊ शकतात व भविष्यात ते अधु होऊ शकतात त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने होणे गरजेचे आहे.

- भरत गायकवाड , प्रतिष्ठित व्यापारी शिरूर कासार.


No comments