Breaking News

महाराष्ट्र केसरीसाठी 86 किलो वजन गटातून बेलगावच्या पै.राहुल पोकळे ची निवड


सरपंच अशोक अण्णा पोकळे यांच्याकडून राहुलला 11 हजार 173 रुपये बक्षीस

आष्टी : नुकत्याच आहेरचिंचोली येथे बीड जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी घेण्यात आली त्यामध्ये आष्टी तालुक्यातील बेलगावचे पैलवान अरुण वस्ताद पोकळे यांचे चिरंजीव पैलवान राहुल पोकळे याची 86 किलो वजनी गटामधून निवड झाली आहे त्याबद्दल आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणारे चिंचाळा राघापूरचे सरपंच अशोक अण्णा पोकळे यांच्या कडून 11 हजार 173 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले व राहुलचा व वडिलांचा सत्कार करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील बेलगावच्या अरुण वस्ताद पोकळे यांचा मुलगा पै. राहुल पोकळे यांची 86 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवीन युवकांना या खेळामध्ये प्रोत्साहन मिळाले पाहिजे युवकांनी जास्तीत जास्त कुस्ती खेळाकडे वळले पाहिजे या उद्देशाने आष्टी तालुक्यातील युवकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असणारे सरपंच अशोक अण्णा पोकळे यांच्याकडून पैलवान राहुल पोकळे याला प्रोत्साहन म्हणून 11 हजार 173 रुपये बक्षीस देऊन एक प्रकारे वेगळा आदर्श निर्माण केला आहे प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींकडून गावातील होतकरू युवकांना जर अशा प्रकारे प्रोत्साहन मिळाले तर नक्कीच आपला महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने पाऊल उचललेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात नक्कीच वेगळा आदर्श युवकांच्या बाबतीत आणि ज्येष्ठांच्या बाबतीत पाहायला मिळेल यात शंका नाही पै. राहुल पोकळे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक तर होतच आहे.

 परंतु त्याच्या आई-वडिलांचा देखील कौतुक महत्त्वाचं असल्याने राहुल व त्याच्या वडिलांचा सत्कार बेलगाव चे सरपंच रामकिसन पोकळे ,चिंचाळा राघापूरचे सरपंच अशोक अण्णा पोकळे, माजी सरपंच बन्सी भाऊ पोकळे, एडवोकेट अजिनाथ पोकळे ,माजी सरपंच अण्णा पोकळे, पत्रकार शरद तळेकर, माजी उपसरपंच संजय पोकळे, हनुमंत पोकळे सर, अण्णासाहेब वांढरे ,ज्ञानेश्वर पोकळे, गणेश पोकळे ,संतोष गोल्हार, बाळू पोकळे, ज्ञानू पोकळे, अमोल पोकळे, बाळासाहेब पोकळे, संतोष गोल्हार, राजू खंडागळे ,संदीप पोकळे ,हनु पोकळे, अण्णासाहेब वडेकर, भरत पैलवान इत्यादी उपस्थित होते.

जय हनुमान तालीम पाटोदा तालमीतील पठ्ठ्या महाराष्ट्र केसरीत धडकणार.. पाटोदा येथील राहुल आवारे यांचा जय हनुमान तालमीतील पैलवान राहुल पोकळे याची नुकतीच आहेरचिंचोली येथे निवड चाचणी मध्ये महाराष्ट्र केसरी साठी 86 किलो वजनी गटामधून निवड झाल्याने आष्टी व पाटोद्यातील जनतेसाठी अजून एक आनंदाची गोष्ट मिळाली असं म्हणावं लागेल कुस्तीमध्ये पाठवले त्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये राहुल आवारे यांच्या माध्यमातून पोहोचलं आता त्यांच्या तालमीतील युवक आता महाराष्ट्रामध्ये धडक ताना आपल्याला पाहायला मिळणार याचा आनंद पाटोदा आष्टी करांसाठी अधिक वाढला आहे.

आष्टी तालुक्यातील युवकांनी खेळाकडे वळावे अडचण आल्यास आम्हाला कळावे- सरपंच अशोक अण्णा पोकळे आष्टी तालुक्यातील युवकांनी आज पर्यंत देश राज्य पातळीवर नाव गाजवला आहे त्याच पद्धतीने युवकांनी यापुढे देखील माती संलग्न खेळांमध्ये आपलं भविष्य घडवण्यासाठी पुढे यावं आणि आपलं भविष्य घडवा व त्यामध्ये कोणतीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत राहू परंतु सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये भरकटत चाललेला युवक हा कसा मातीतील खेळांकडे वळेल हाच आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही युवकांना प्रोत्साहन देण्यास तयार आहोत फक्त युवकांनी मातीतील खेळाकडे वळावे हीच आमची अपेक्षा आहे

 

युवकांना गाव पातळीवरून प्रोत्साहन मिळणं महत्त्वाचं!

क्षेत्र कोणतेही असो परंतु गाव पातळीवरून जर युवकांना प्रोत्साहन मिळाले तर युवक नक्कीच चांगली कामगिरी करून आपल्या गावाचं नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव एक उज्वल केल्याशिवाय राहणार नाही परंतु प्रत्येक गावातील ज्येष्ठांना पासून लहाना पर्यंत म्हणजेच सर्वांनी जर युवकांना आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये जर प्रोत्साहन मिळाले तर नक्कीच चांगलं कार्य करतील यात तिळमात्र शंका नाही, असे चिंचाळा - राघापूर गावचे सरपंच अशोक अण्णा पोकळे म्हणाले. 


No comments