Breaking News

शिरूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिरूर कासार : राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील तरुणांना रक्तदान करण्यासाठी आवाहान केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत "राष्ट्रवादी युवक काॕग्रेस"च्या वतीने शिरुर कासार येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी शिरुर तालुक्यातुन तरुणांनी या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काॕग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी,व कार्यकर्त्यांनी मिळून तब्बल 15 हजार 200 बाटल्या रक्तदान करुन बाटल्या गोळा केल्या होत्या.त्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्रात कोरोणा रुग्नांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी तुटवडा भासत आहे.राज्याकडे केवळ 5-6 दिवस पुरेल एवढेच रक्ताचा पुरवठा शिल्लक आहे.त्यामुळे आज देशाचे नेते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्यातील प्रत्येक युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी शिरुर येथे रक्तदान करण्यासाठी तरुन वर्ग पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रक्तदान केले आहे.

महाराष्ट्रात कोरोणा रोगाने थैमाण घातल्यामुळे रुग्नांना रक्ताची आवश्यकता पडत आहे.त्यामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून "राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने“ मी रक्तदान करणार व माझ्या एका भावाला जीवदान देणार” हे अभियान राबवुन रक्तदान शिबिर ठेवले होते.त्यासाठी तालुक्यातुन एकुण 57 तरुणांनी अभियानाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.रक्तदान करताना युवा नेते अस्लम शेख.व राक्षसभुवन येथील जावेद शेख.त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी युवक काॕग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख.राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास नागरगोजे.पञकार मनोज परदेशी.राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष विनोद पवार.माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे.नगरपंचायत राष्ट्रवादीचे गटनेते नशिर शेख.धर्मराज जायभाये.माजी सभापती भिमराव गायकवाड,सावता कातखडे.माही शेख.प्रल्हाद जरांगे.गणेश मोरे.पोपट खामकर.अनिल खोले.यांची उपस्थिती होती. 

No comments