Breaking News

1400 रुपयांचे रेमडिसीवीर 5 हजारावर विक्री : बीडमध्ये एका मेडिकल चालकावर गुन्हा दाखल

आशिष सवाई । बीड 

राज्यासह बीड जिल्हात कोरोनाचा कहर वाढला असताना बांधितांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णालयात बेड मिळत नाही. काहींना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. आशा भयावह परिस्थितीत मात्र बीडमध्ये रेमडीसीवीरचा तुटवडा निर्माण करून त्याची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड आला असून १४०० रुपये किंमतीचे रेमडीसीवीर इंजेक्शन तब्बल ५ हजार ४०० रुपयांना विकणाऱ्या एका मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार राज्यासह आणि बीड जिल्हात कोरोनाने पाय पसरल्याने बांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्यापही कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आलेली नसून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने राज्य सरकार देखील चिंता व्यक्त करत आहे. अनेक रुग्णालयात बेड मिळत नाही. काहींना मृत्यू सामोरे जावे लागत आहे. अशा भयावह परिस्थितीमध्ये मात्र बीडमध्ये रेमडिसीवीरचा तुटवडा करुन  रुग्णांना चढ्याभावाने रेमडेसीवीरचे इंजेक्शन  विक्रीचा गोरख धंदा नुकताच उघडकीस आला असून गुरुवारी १४०० रुपये किंमतीचे रेमडीसीवीर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपयांना विकली जात असल्याची तक्रार येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष सोहनी यांनी पोलिसात केली असून याप्रकरणी लाईफ लाईनच्या मेडिकल चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

No comments