Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त रक्तदान शिबिर


किल्लेधारुर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विविध समाजीक उपक्रम राबविले जात आहेत. अशा सामाजिक उपक्रमातूनच डॉ. बाबासाहेबांची 130 वी जयंती साजरी करण्याचे समाधान मिळणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर बंदी घातलेली आहे. संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे.दरवर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करुन रक्तदान शिबिरचे आयोजन केले आहे यात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी तसेच भीम सैनिकांनी दिनांक.12 एप्रिल वार सोमवार ठिक.10 ते 5 वाजेपर्यंत जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करावे.असे आव्हान सार्वजनिक भीम जन्मोत्सव समिती धारूर करत आहे. 

No comments