Breaking News

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने संजय गांधी,श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 13 कोटी 84 लाख वर्ग


समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर,अशफाक इनामदार यांची माहिती 
 बीड  :   संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 8 हजार 282 लाभार्थी आहेत. त्यांना एकूण 4 कोटी 14 लाख 10 हजाराचे वेतन व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे एकूण 15 हजार 500 एकूण 40 लाभार्थी असून त्यासाठी 10 कोटी 56 लाख 13 हजार रूपयाचे वेतन तर वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी 6 हजार 290 लाभार्थी आहेत. त्यांना 3 कोटी 14 लाख 50 हजार रूपयांचे वेतन असे एकूण 3 हजार 111 लाभार्थीसाठी 13 कोटी 84 लाख 73 हजार रूपयांचे वेतन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने वर्ग करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अशफाक इनामदार यांनी दिली आहे. 

आ.संदिप भैय्या क्षीरसागर हे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावोगावी आमदार आपल्या दारी अभियान राबवत असून निराधारांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्यानंतर सदरील अनुदान तातडीने निराधारांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सूचना करत सदरील प्रश्न मार्गी लावून घेतला आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाचा काळ सर्वांसाठी अवघड जात असून आमदार संदिप भैय्या क्षीरसागर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हे अनूदान हे श्रावणबाळ योजना ओपन व ओबीसी लाभार्थी यांचे नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी तहसीलदार शिरीष वमणे, नायब तहसिलदार कुटे मॅडम, काळे व सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निराधारांचे समिती अंतर्गत लाभार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अशफाक इनामदार यांनी म्हटले आहे.
 दलालाकडे हयातनामे देऊ नका
लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे
जे लाभार्थी आयसीआय बँक व डिसीसी बँकेत पगार घेत होते. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून जुने खाते पासबुक व नवीन राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक घेवून आधार कार्डची झेरॉक्स व स्वयंघोषणापत्र घेवून तहसील कार्यालयात दाखल करावेत. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थींनां प्रत्येक वर्षी हयातनामे देणे बंधनकारक असते परंतु यावर्षी कोविडमुळे हयातनामे देऊ नयेत असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अशफाक इनामदार यांनी केले आहे. 

No comments