Breaking News

Mpsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थांवरील गुन्हे मागे घ्यावेत : शेख


राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांची गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

शिरूर कासार : Mpsc ची नियोजित परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रभर या निर्नयाच्या विरोधात mpsc ची तयारी करनारे विद्यार्थी हे रस्त्यावर आले होते व त्यांनी आंदोलन सुरु केले होते.यावेळी आंदोलन करनाऱ्या विद्यार्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी युवक काॕग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी गृहमंञ्यांना गुन्हे माघे घेण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतिने MPSC च्या विद्यार्थी वर ११ मार्च रोजी आंदोलनाचे राज्यभर दाखल झालेले गुन्हे हे मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काॕग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या उपस्थीतीत मा. गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना दिले.व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत म्हणुन चर्चा केली. विद्यार्थीना भविष्यात अडचणीत येऊ नये हि अपेक्षा व्यक्त केल्याच्या नंतर जयंत पाटील व अनिल देशमुख यांनी तातडीने गुन्हे मागे घेऊ विद्यार्थांचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द यावेळी दिला आहे.
No comments