Breaking News

परळीत व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून लॉककडाऊनचा केला निषेध

परळी :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉककडाऊन केले आहे.  या लॉककडाऊनला जिल्ह्यातील सर्वच व्यापारीवर्गाने विरोध केला असुन परळीतील सर्व व्यापाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ०७ ते ०९ :०० वाजेदरम्यान दुकाने बंद ठेवुन जिल्हा प्रशासना विरूध्द निषेध नोंदवला.

राज्यासह अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन शासनस्तरावर याला रोखण्याचे प्रयत्न केले जात आहे. राज्यातील जिल्हानिहाय परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तेथील जिल्हाधिकारी यांना दिले गेले असुन त्यानुसार जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉंकडाऊन लागु करण्यात आले मात्र व्यापार्‍यांना सकाळी सात ते नवु यावेळेत आपली दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली असुन दोन तासात कसा व्यापार करावा असे व्यापारी वर्गातुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन सवाल केला गेला असुन आम्ही दुकानेच बंद ठेवुन निषेध करतो हि भुमिका व्यापारी वर्गाने घेत परळीतील सर्वच दुकाने व्यापार्‍यांनी बंद ठेवत जिल्हाधिकारी यांच्या लॉंकडाऊन आदेशाचा निषेध व्यक्त केला आहे.
No comments