Breaking News

दिंद्रुड पोलीस हद्दीत गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांपुढे आव्हान

चार दिवसांत विविध प्रकरणात ८ गंभीर तर ३४ जनांवर दखलपात्र गुन्हे दाखल

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत टाळेबंदी काळात गुन्हेगारीने डोके वर काढले असून गेल्या चार दिवसात तीन विविध प्रकरणात आठ जण गंभीर जखमी तर तब्बल चौतीस जणांवर दखलपात्र गुन्हे  दिंद्रुड पोलिसात दाखल झाले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी दिंद्रुड पोलिसांसमोर अवाहन ठरत आहे. 

गेल्या चार दिवसांमध्ये दिंद्रुड पोलीस हद्दीतील अनुक्रमे मोगरा,टालेवाडी, हिंगणी या तीन गावात तीन प्रकरणात खुनाचे प्रयत्न करत गंभीर जखमी झालेल्या भांडणात आठ जन गंभीर जखमी झाले असुन तब्बल चौतीस जणांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचे अटक सत्र सुरू झाले आहे. मोगरा येथील ऊसतोड मजूर व ऊसतोड मुकादम यांच्यात शुक्रवारी दि २६ रोजी पैशांच्या देवाण-घेवाण वरुन बाचाबाची होऊन चारजन गंभीर जखमी झाले होते.यात 19 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. हिंगणी येथील शेतीच्या  वादावरून शुक्रवारी दि २६ रोजी झालेल्या भांडणात दोन जण गंभीर जखमी झाले असून ११ जणांवर परस्पर विरोधी दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात अण्णासाहेब राधाकृष्ण माने यांच्या फिर्यादी वरुन तायराम किसन माने,निवृत्ती लक्ष्मण माने  एकनाथ किसन माने  परशुराम किसन माने  लक्ष्मण निवृत्ती माने  किसन सुखदेव माने  सुखदेव लक्ष्मण माने अशा सात जणांवर  कलम 307  324 323  504  143 147 148  149  नुसार  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

याच प्रकरणात परस्पर विरोधी  लक्ष्मण निवृत्ती माने  यांच्या फिर्यादीवरून  आरोपी अण्णासाहेब राधाकिसन माने  अशोक राधाकिसन माने  मुकिंदा सोपान माने  रामभाऊ सोपान माने  आदी चार जणांवर  कलम 326 ,324,504,506,34  भादवि नुसार  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टालेवाडी फाट्यावर नित्रुड येथील सुनील गायकवाड या युवकास शुक्रवार दि २६ रोजी चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करत डोके फोडल्याने सदर युवक गंभीर जखमी झाला असून बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे सुनील गायकवाड यांची पकृत्ती चिंताजनक असून त्याच्या फिर्यादीनुसार परमेश्वर पवार ज्ञानेश्वर शामराव चव्हाण कृष्णा शेषराव राठोड सचिन शंकर राठोड दोन अनोळखी व्यक्तींवर कलम 307,143,147,148,149 भादवि नुसार दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान दिंद्रुड पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अवाहन ठरत आहे.  

दिंद्रुड पोलीस हद्दीतील जनतेने कायदा व सुव्यवस्था आबादित राखावी. कुणाच्या तक्रारी असतील तर दिंद्रुड पोलिसांसी तात्काळ संपर्क साधावा, कायदा कुणीही हातात घेऊ नये कायदा मोडणाऱ्या व्यक्तींवर दिंद्रुड पोलीस कठोर कारवाई करतील. 

-सपोनि अनिल गव्हाणकर

No comments