Breaking News

हवामान दिनानिमित्त अभाविप तर्फे गेवराईच्या चिंतेश्वर विद्यालय वृक्षारोपण

बीड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर सदैव तत्पर अभाविपने २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिनानिमित्त गेवराई येथे चिंतेश्वर विद्यालय या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी चिंतेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाठक मॅडम, घोलप सर, चंदने सर, वाघमारे सर, अभाविपचे तालुकाप्रमुख योगेश खराडे, बीड जिल्हा सहसंयोजक शुभम करवंदे, गेवराई शाखा शहर मंत्री अभिषेक सगळे, शहर कला मंच प्रमुख आदित्य कांबळे, तुषार टेकाळे उपस्थित होते.

     या रोपाची पुढील संवर्धनाची जबाबदारी चिंतेश्वर विद्यालयाने हाती घेतले. शुद्ध हवा ही शरीरासाठी महत्त्वाची असते व आधुनिक जीवनात वाढते हवामान प्रदूषण ही एक समस्या निर्माण झालेली आहे. याप्रसंगी अभाविप कार्यकर्त्यांनी व शिक्षक वृंदांनी हवामानाला विपरीत वस्तू टाळू अशी प्रतिज्ञा केली.
No comments