Breaking News

चित्रा यांना कायदातला वाघ दाखवा बंजारा समाजाच्या बदनामी विरोधात तक्रार - चव्हाण , राठोड


बीड : कायद्याने संजय राठोड यांच्यावर ना गुन्हा दाखल ना गुन्हा सिद्ध तरी जाहीर पत्रकार परिषदेत बलात्कारी असा उल्लेख करून चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने समाज संतप्त आहे , याच संतापातून बीड येथील शिवाजी नगर ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली असून या संदर्भात गुन्हा दाखल करा अशी मागणी संगीता चव्हाण व कृष्णा राठोड यांनी केलेली आहे. 

        पूजा चव्हाण यांनी तिला असलेल्या आजारामुळे आत्महत्या केल्याची नोंद वडिलांकडून पोलिस ठाण्यात करण्यात आलेली असतानाही भाजपच्या पुणे येथील नगरसेवक व चित्राताई वाघ या दोघांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यात महत्त्वाचा भांडवल करत समाजातील असलेल्या तरुणाची व समाजाची बदनामी केल्या बाबत भाजप पिल्लू असलेल्या गुन्हे दाखल करण्याची मागणी ऍड संगीता चव्हाण व कृष्णा राठोड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पूजा चव्हाण यांचे वडील लहू चव्हाण यांनी आपल्या मुलीला आजार असल्याने आत्महत्या केल्याचे जवाबी नोंद पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्यात दिली असतानाही भाजपाच्या नगरसेवक व भाजपाच्या महिला उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी आपल्या राजकीय हेतू साधण्यासाठी भांडवल करून अशोभीत फोटो, ऑडिओ क्लिप व व्हिडिओ वृत्तवाहिन्यांना देत. वाटेल तशी बदनामी इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रसार माध्यमांमधून वारंवार प्रसारित करून वाटेल तसे बदनामी करून विटंबना करण्यात आली. 

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या नावाची चुकीच्या पद्धतीने घोषणा करून महाराजांची चेष्टा उडवल्याबद्दल समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण यांच्या पुणे येथील फ्लॅट मध्ये कुठलीही परवानगी नसताना चोरीच्या मार्गाने जात आणि वैयक्तिक असलेल्या लॅपटॉप व मोबाईल या नगरसेवकाने आपल्या ताब्यात घेत तरुणीची अशोभीत फोटो प्रसारित करत या समाजाची बदनामी केली या प्रकरणी पुणे येथील भाजपा नगरसेवक व भाजपाच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी संगीता चव्हाण, कृष्णा राठोड,  एकनाथ चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील  बंजारा बांधवांनी केली आहे.

No comments