Breaking News

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ऑफलाइन पासेस चा उडाला फज्जा नागरिकांच्या तक्रारीनंतर ॲड.शेख शफिक भाऊ ॲक्शन मोडमध्ये

 

बीड :  26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा लॉकडाउन केला असून नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हा बाहेर जाण्याकरिता किंवा बाहेरून जिल्ह्यात येण्याकरिता ऑफलाइन पासेस तहसील कार्यालयामार्फत मिळतील असे घोषित करून या कार्यासाठी नियुक्त केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जनतेसाठी खुले केले. मात्र या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी एक तर बंद येत आहेत किंवा ते कॉल रिसिव्ह करत नसल्याच्या तक्रारी एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्याकडे काही नागरिकांनी केले असता त्यांनी ॲक्शन मोड मध्ये येऊन थेट तहसील कार्यालयात जाऊन या प्रक्रियेचा आढावा घेतला.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारींनी दहा दिवसाचे लॉकडाउन बीड जिल्ह्यासाठी घोषित करून जिल्हा बाहेर जाण्यासाठी व बाहेरून येणाऱ्यांसाठी ऑफलाइन पासेस लागतील. त्याशिवाय ये-जा करण्यास परवानगी नसेल. असे आदेश दिल्यानंतर याकामी तहसील कार्यालयात चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्या लोकांना ये-जा करण्यासाठी पासेस ची गरज आहे अशा लोकांनी या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधून तहसील कार्यालयात जाऊन ऑफलाइन पासेस घ्यावेत. अशी प्रक्रिया केल्यानंतरच नागरिकांना ये-जा करता येणार आहे. परंतु पासेस देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी एक तर बंद येत आहेत किंवा ते उचलून नागरिकांशी बोलत नसल्याने तहसील कार्यालयात जवळपास शंभर एक नागरिकांचा गलका जमा झाला होता.
 तर तिथेही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नागरीकांचा गोंधळ उडाला म्हणून काही जणांनी ॲड. शेख शफीक भाऊ यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली असता अशा अडल्या-नडलेल्यांच्या गरजेवर आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून धावून जाणारे भाऊ यावेळी सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आले आणि स्वतः जातीने तहसील कार्यालयात जाऊन या सर्व प्रक्रियेचा आढावा घेत जबाबदार अधिकारी आणि तहसीलदार शिरीष ओमने यांच्या समोर नागरिकांच्या अडचणी व व्यथा मांडल्या. यावर तहसीलदारांनी यापुढे नागरिकांना ऑफलाइन पासेस साठी अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. शफिक भाऊंच्या तत्परतेमुळे अत्यावश्यक कामासाठी जिल्हा बाहेर ये-जा करणाऱ्यांचा प्रश्न तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मिटल्याने नागरिकांनी या प्रश्नासाठी धावून येणाऱ्या शफिक भाऊंचे आभार व्यक्त केले.

No comments