Breaking News

शिरुर शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई


३७ जणांकडून केला ७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल 

विना मास्क घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळा, प्रशासनास सहकार्य करा

मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले शिरूरकरांना आवाहन

शिरूर कासार : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्यासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे वारंवार आवाहन करून सुद्धा मास्क विना बेफिकिरीने शिरुर कासार शहरात फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी (दि.९) शहरात  विना मास्क फिरणार्‍या ३७ जणांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ७ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यात आजपर्यंत शिरुरकासार नगर पंचायती मार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण ७० लोकांवर कारवाई करुन १८ हजार १९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

 

कोरोना संसर्ग पुन्हा फैलावू लागला असताना शिरुर कासार शहरासह जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र असे असताना कोणत्याही सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता नागरिक  बेफिकिरपणे वावरताना दिसत आहेत. मास्क विना वावरत असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्याचं दिसत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याचं व सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु कोरोनाचे नियम पायदळी तुडवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रिकाम टेकड्या व विना मास्क शहरात हुंदडणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

शिरुर कासार शहरात मंगळवारी (दि.९) शहरात  विना मास्क फिरणार्‍या ३७ जणांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ७ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

दुसर्‍या टप्प्यात आजपर्यंत शिरुरकासार नगर पंचायती मार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण ७० लोकांवर कारवाई करुन १८ हजार १९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरु नये, तसेच अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडतांना मास्क परिधान करावे, दुकान व्यावसायीकांनी आपल्या दुकानासमोर ३ फुट अंतरावर दोरी बांधावी, दुकानांमध्ये Social Distancing चे पालन करून ५ ग्राहकांची मर्यादा पाळावी. स्वच्छता आणि प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.

No comments