Breaking News

लोखंडी फुंकणीने नवऱ्यानं बायकोचे डोके फोडले

गौतम बचुटे । केज

केज तालुक्यातील शिरूरघाट येथे नवऱ्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी फुंकणी मारून तिचे डोके फोडून दुखापत केली आहे

.

केज तालुक्यातील शिरूर घाट येथे दि. २० मार्च रोजी रात्री ११:०० वा. च्या दरम्यान सुनीता विक्रम सांगळे हीस तिचा नवरा विक्रम सांगळे याने त्याची बहीण रुक्मिणी हिस त्याच्या बायकोने घरी जेवणासाठी व झोपायला का बोलाविले नाही? या कारणावरून शिवीगाळ केली आणि डोक्यात चूल फुंकायला वापरण्याची लोखंडी फुंकणी मारून डोके फोडून दुखापत केली. त्या नंतर सुनीता हिला तिचे नातेवाईक नारेवाडी येथे माहेरी घेऊन गेले.

दि.२१ मार्च रोजी सुनीता सांगळे हिच्या फिर्यादी वरून तिचा नवरा विक्रम सांगळे याच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. १३०/२०२१ भा. दं. वि. ३२४ व ५०४ नुसार शिवीगाळ व दुखापत करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.
No comments