Breaking News

पंकजाताई मुंडेंमुळे ग्रामपंचायतीला मिळाले कार्पोरेट कार्यालय ; दीड कोटीच्या निधीतून गावांत आल्या सुखसोयी !


लातूर जिल्हयातील गंगापूरच्या  सरपंचांची यशोगाथा ; पंकजाताईंचे मानले आभार

लातूर : ग्रामपंचायतीला सर्व सुविधांनी सुसज्ज असे कार्पोरेट कार्यालय, गावात पक्के रस्ते आणि नाल्या, स्वच्छतागृह, सांस्कृतिक सभागृह, पथदिवे अशा कितीतरी सुख सोयींनी आज आमच्या गांवचे रूप पालटले आहे आणि हे सर्व शक्य झाले ते भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या निधीमुळे... गंगापूर जि. लातूर गांवचे सरपंच बाबू खंदाडे यांनी हे सांगतानाच पंकजाताई मुंडे यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना राज्यातील प्रत्येक खेडयाला मुलभूत विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी दिला, त्यातून गावांत चांगली कामे झाली. लातूर जिल्हयातील गंगापूरचे सरपंच बाबू खंदाडे गांवची यशोगाथा सांगतांना म्हणाले की,  ग्रा. पं. ला कार्यालय नव्हते, गावात पक्के रस्ते नव्हते, खूप समस्या होत्या परंतू हया सर्व समस्या पंकजाताई मुंडे यांनी ओळखल्या.  ग्रामविकास मंत्री असताना ग्रामस्थांनी मागणी केली आणि त्यांनी ताबडतोब सन २०१८-१९ आणि २०१९-२० यावर्षात मुलभूत विकासाचा ३० लाख रूपये निधी दिला आणि त्यातून आज ग्रामपंचायतीला कार्पोरेट असे सुसज्ज कार्यालय मिळाले. मिटिंग हाॅल, वाहनतळ, सरपंच व सदस्यांची बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, ग्रामसेवकाची केबीन अशी स्वतंत्र इमारत तयार झाली. याशिवाय पंकजाताईंनी दीड कोटीचा वेगळा निधी दिला त्यातून मुख्य रस्ते, नाल्या, सभागृह, पथदिवे अशी कामे झाली आणि आमचे गांव सुख सोयींनी समृद्ध झाले. 

ट्विट करत मानले आभार

ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी दिल्याबद्दल सरपंच बाबू खंदाडे यांनी कार्यालयाच्या फोटोसह  ट्विट करून आपण दिलेल्या निधीमुळेच मला ग्रामपंचायतीची सुंदर व प्रशस्त इमारत बांधता आली असे सांगत पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले. पंकजाताईंनी देखील यावर ट्विट करत "ग्रामविकासाच्या पायाचे मजबुतीकरण महत्वाचे मानून आपण काम केले, आपल्या गावासाठी अत्यंत सुंदर वास्तु झाली आहे, असे म्हणत अभिनंदन केले.

No comments