Breaking News

आठवडी बाजार बंद झाल्यावर गोरगरिब,शेतकरी,व्यापाऱ्यांनी जगायचं कसं?


गोरगरीब शेतकरी, व्यापाऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल?

धामणगाव :  इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाची परिस्थिती नियंत्रणात असतानाही व तसेच प्रदीर्घ लॉक डाऊन,कोरोना सदृश्य परिस्थिती गेल्या एक वर्षापासून सर्वसामान्य गोरगरिब,शेतकरी, लहान-मोठे व्यापारी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत,अजूनही उद्योगधंदे,व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीत,गोरगरीब जनतेला रोजगार मिळत नाही, अनेक गोरगरीब सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत,काही गोरगरीब जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे.

या सर्व परिस्थितीला तोंड देत तो कसाबसा जीवन जगत होता.त्यातच आज जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश काढले आहेत,व इतरही काही निर्बंध लावले आहेत.यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी,व्यापार्‍यांनी कसं जीवन जगायचं असा संतप्त सवाल या वर्गातून विचारला जात आहे.या बाजारावर अवलंबून असलेल्या  सर्वसामान्य जनतेने, शेतकऱ्यांनी, लहान-मोठे व्यापाऱ्यांच्या घरच्या चुली कशा पेटणार? आधी आमच्या पोटापाण्याचा,रोजगाराचा प्रश्न सरकारने सोडवावा आणि मग आठवडी बाजार बंद करावा अशी मागणी या सर्वसामान्य वर्गातून होत आहे.
No comments