Breaking News

भाजप नेत्यांकडून पोलिसांना अपमानास्पद वागवणूकीची घटना निषेधार्ह - अजय सुरवसे


भाजप नेत्यांचा
देशभक्ती, पोलीसाबद्दलचा आदराचा ढोंगीपण ; भाजप नेते अनिल बोंडे यांचा सुरवसे यांनी केला धिक्कार 

बीड : भाजप देशभक्ती, पोलीसाबद्दलचा आदर हा ढोंगीपणा करत असल्याचा प्रकार नुकताच उघड आहे. सध्या एक चित्रफीत चांगलीच व्हायरलं झाली असून त्यामध्ये कर्ताव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याशी खालच्या पातळीवर भाष्य करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भाजप नेते अनिल बोंडे यांचा आ. संदीप क्षीरसागरांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे यांनी निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

कोरोनाच्या महाभयंकर रोगाच्या संकटसमयी पोलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांना बळ देण्याऐवजी त्यांच्यासोबत अशा प्रकारे नीच पणाने वागणाऱ्या भाजप नेत्यावर कडक कार्यवाही व्हायला हवी. महाविकास आघाडी सरकारने सदैव पोलिस अधिकारी यांचा सन्मान केलेला आहे, आणि पुढेही करत राहील.  पोलीस अधिकाऱ्यांशी मुजोरीत बोलणाऱ्या भाजप नेते अनिल बोंडे यांचा संदीप क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे यांनी धिक्कार केला असून आशा मुजोर भाजपा नेत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  पत्रकाद्वारे केली आहे.
No comments