Breaking News

गाडीत बनावट टोप्या अन् पाट्या ठेवणाऱ्या लोकांवर कार्यवाही व्हायला हवी


महाराष्ट्र शासन, प्रेस, पोलीस असले बोर्ड लावून ऐट मिरविणारे ठक

गौतम बचुटे । केज  

आपण इतरां पेक्षा वेगळे आहोत. हे दाखविण्याचा आटापिटा करणारे; पूर्वी व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, असले स्टिकर वाहनांच्या दर्शनी भागावर लावून फिरत असत. पण आता नवीनच टूम आली असून काही निवृत्त अधिकारी हे गाडीच्या बॉनेटवर दर्शनी भागात बाहेरून दिसेल अशा ठिकाणी पी-कॅप, किंवा वेगवेगळे बोर्ड लावून सर्रास वावरत आहेत.

खाजगी गाडीत कोणी वाहतूक शाखा किंवा परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवून कागदपत्र तपासणीची मागणी करू नये. बिनाबोभाट प्रवास करता यावा आणि आपण इतरांपेक्षा विशेष आहोत. हे दाखविण्यासाठी अनेकजण वेगवेगळी शक्कल लढवीत आहेत.

केज तालुक्यात अनेक वाहनांवर प्रेस, पोलीस, महाराष्ट्र शासन, विशेष कार्यधिकारी असे बोर्ड दर्शनी भागावर लावून बिनदिक्कत वावरत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याने चौकशी केली तर त्यांच्या अंगावर धावून जान्या पर्यंत अशा सयंघोषित पाटी बहाद्दर लोकांची मजल अनेकदा जाते. म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर होत आहेत.

अशा पाटी बहाद्दर आणि टोपी बहाद्दर लोकांच्या विरुद्ध तसेच सेवा निवृत्त असूनही गाडीत टोप्या ठेवून आणि बनावट स्टिकर लावून फिरणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने कठोर कार्यवाही करावी तरच असले प्रकार बंद होतील. ■ सेवा निवृत्त पोलीस अधिकारी हे त्यांच्या खाजगी गाडीत पी-कॅप बाळगतात

◆ काही जण पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि प्रेस अशा पाट्या लावतात

● काहीजण आर्मी व संरक्षण सेवा असे ही बोर्ड लावतातNo comments