Breaking News

'येडेश्वरी' ने केले ५ लाख मेट्रिक टन गाळप पुर्ण


गौतम बचुटे । केज 

आनंदगांव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने ७ व्या गळीत हंगामाची सुरुवात केली आणि आज १० मार्च २०२१ रोजी कारखान्याने पाच लाख टन गाळप करून ठरवलेल्या उद्दिष्टाकडे योग्य रितीने वाटचाल चालू असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा संस्थापक बजरंग सोनवणे यांनी सांगितले. पाच लाखाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे कर्मचा-यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.

 येडेश्वरीच्या ५ व्या हंगामाच्या प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात २२ नोव्हेंबर २०२० झाली होती. आज रोजी १३७ दिवसांमध्ये कारखान्याने ५ लाख टन गाळप करून साखरेचे उत्पादन ४ लाख ४४ हजार क्विंटल घेतले आहे. कारखाना प्रति दिवस ३७०० मेट्रिक टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुद्धा चांगल्या पध्द्तीने सुरळीत सुरु असून दररोज ताशी १० मेगावॅट वीजनिर्मिती केली. 

जाते. त्यात आजअखेर २ कोटी ९५ लाख १६ हजार वीज युनिट निर्मिती झाली आहे. त्यापैकी १ कोटी ६१ लाख ४३ हजार ६०० युनिट महावितरण कंपनीला विक्री केली आहे. तर उर्वरित वीज कारखान्यासाठी वापरण्यात आली. त्याचबरोबर आसवनी प्रकल्पातून इथेनाॅल ५६ लाख ८६ हजार ८४५ लिटर व आर/एस/इएनए ३ लाख ८२ हजार ७६ लिटरचे उत्पादन घेतले आहे. ५ लाख मेट्रिक टन गाळप कारखान्याने यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी शेतकरी, संचालक,सभासद, बिगर सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार व सर्व कारखान्याचे अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ठरविलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अधिक-यांना, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.

No comments