Breaking News

गंठण चोर महिला जेरबंद

बीड : गर्दीचा फायदा घेऊन गंठण चोरणार्‍या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने जेरबंद केले असून तिच्याकडून चोरलेले गंठणही जप्त करण्यात आले आहे.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगण राजुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या गोदावरी परमेश्वर फिरंगे (रा. शाहूनगर) या वृद्ध महिलेचे गंठण २ मार्च रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. काल गंठणचोर महिला बीड येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय भारत राऊत यांना मिळाल्यानंतर काल बीड बसस्थान परीसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी गंठण चोरणारी महिला जाधव निलाबाई सुखदेव (रा. मिरसांगवी ता. पाथर्डी) हिला ताब्यात घेतले. या वेळी तिच्याकडून चोरलेले गंठणही पोलिसांनी जप्त केले आहे.
No comments