Breaking News

मोगरा तांडा दुर्घटनाग्रस्तांना सभापती संभाजी शेजुळ यांनी केली आर्थिक मदत

 


माजलगाव : तालुक्यातील मोगरा शिवाजी तांड्यावर झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटातील दुर्घटनाग्रस्तांना माजलगाव बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी सदर कुटुंबीयांना आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मदत देवून या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले. 

गेल्या २५ फेब्रुवारी रोजी मोगरा गावाजवळील शिवाजी तांड्यावर एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले. तसेच त्या घराच्या शेजारील दोन घरामध्येही आर्थिक व संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. यामुळे तीन कुटुंब उघड्यावर पडले होते. यांना काही दिलासा मिळावा म्हणून माजलगाव बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यानी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. या दुर्घटनाग्रस्तांमध्ये अशोक रामा पवार, प्रकाश रामा पवार, विकास पवार या कुटुंबियांचा समावेश आहे. या मदतीमुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबाने समाधान व्यक्त केले. तसेच आमदार आ.प्रकाश दादा सोळंके यांच्या  मार्गदर्शनाखाली शासनाकडून लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत मिळवून देणारअसल्याचेही सभापती संभाजी शेजुळ यांनी सांगितले.

No comments