Breaking News

परडी माटेगाव काडीवडगाव रस्त्याची बोगस काम करणाऱ्या उप अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करा ; रिपाइंचे (गवई गट) नईम आतार यांची मागणी


माजलगांव : वडवणी तालुक्यातील मौजे परडी माटेगाव ते काडीवडगाव रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे न करता व फलक न लावता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इंजिनियर, कर्मचारी, गुत्तेदार यांच्या संगनमताने हे रस्त्याचे बोगस व निकृष्ट दर्जाचे चालू असून

यापूर्वीही पात्रुड, लोणगाव रस्त्याची असेच थातूरमातूर व बोगस निकृष्ट दर्जाचे काम उप अभियंता व कार्यकारी अभियंता, इंजिनिअर, कर्मचारी, गुत्तेदार यांच्या संगनमताने करण्यात आलेले आहे. त्याचे देखील निवेदन असतानाही व सात महिने होऊन अद्याप कार्यवाही कार्यकारी अभियंता यांच्याकडून झालेली नाही. व उपोषण आंदोलन करून ही कार्यकारी अभियंता हे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, कर्मचारी, गुत्तेदार यांची पाठराखण केल्याचे उघड पणे निष्पन्न होत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. तसेच अर्जदारांना कार्यकारी अभियंता व उपोषणकर्त्यांनाच कार्यकारी अभियंता उलट-सुलट म्हणतात की बोगस निकृष्ट म्हणजे कसे असते तुम्हास काही समजते का? अशा  उद्धट भाषेत दमदाटी करून बोलतात व अशी उपोषण केले कोठेही गेला तरी आमचे काही होत नसते. 

अशी उद्धट भाषा बोलता तरी अशा वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता, कर्मचारी यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून त्यांचे चालू वेतन बंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व संबंधित गुत्तेदारावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच होत असलेल्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये व संबंधित गुत्तेदारास काळया यादीत टाकून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. अन्यथा येत्या १५ दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट )च्या वतीने असंख्य कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घेण्यात यावी. व त्यात काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट ) सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग बीड नईम आतार यांनी दिला आहे.

No comments