Breaking News

स्मशानभुमी बचाव जनआंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

बीड :बीड जिल्ह्यातील ज्या गावा खेड्यात मशानभुमी च्या जागेचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचे निवासी जिल्हाधिकारी  संतोष राऊत यांना स्मशानभूमी बचाव जनआंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात असे म्हटले की ग्रामीण भागात स्मशानभूमीच्या जागेवर गावागावात वाद-विवाद होत आहेत अनेक गावात महसूल विभागाने स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवले आहेत. 
अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या नावाने स्मशानभूमीच्या जागेची नोंद आहे परंतु त्या जागेवर स्मशानभूमी लगतच्या व्यक्ती  ने अतिक्रमण करून ताबा केला आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत शासनाच्या महसूल विभागाने वादग्रस्त जागेची चौकशी करून अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. ज्या गावात गायरान जमिनी कास्तकारांच्या ताब्यात आहेत. त्या त्यांच्या नावे करण्यात याव्यात व जलसमाधी घेतलेल्या स्वर्गीय संजय ताकतोडे यांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन स्मशानभूमी बचाव जनआंदोलनाच्या वतीने  जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सदरील निवेदन देण्यात आले या मागणीचे निवेदन देताना राज्यध्यक्ष अशोक सोनवणे,राज्य कार्याध्यक्ष राजाराम जाधव ,अंकुश चव्हाण मराठवाडा अध्यक्ष, डॉ.माणिक कांबळे ,लालासाहेब शिंदे, राज्य सचिव सुधाकर धुरंधरे, विष्णू तुपसौदर , आष्टी तालुका अध्यक्ष नागेश डाडर इत्यादी कार्यकर्ते होते.
No comments