Breaking News

गुणवंत खेळाडू पेन्शन योजना- भारत सरकार योजना

 


         बीड :- भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे दि. 07जून 2018 रोजीच्या परिपत्रक,निर्णयानुसार  गुणवंत खेळाडूकरीता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना असल्याचे सदरच्या परिपत्रकात  नमुद केले आहे.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. तसेच या योजनेबाबतचे निकष सदर परिपत्रकातील  1.1,1.2,2,3,4,5,6 अन्वये दिले असून याबाबतचा अर्जाचा नमुना दिला आहे.

या योजनेच्या निकष क्र.6 अन्वये  सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार ) या स्पर्धेत सुवर्ण,रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त, गुणवंत खेळाडूस  खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतुद केली आहे. तसेच पेंशन 30 वर्षापासून (किंवा सक्रीय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल ) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या,तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतू अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून  निवृत्त झाले असतील.

 

अ.क्र

स्पर्धेचे नाव

दरमहा मानधन रक्कम

1

ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक

20,000/-

2

सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा  (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळप्रकार )

16,000/-

3

रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळप्रकार )

14,000/-

4

सुवर्ण पदक -कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स

14,000/-

5

रौप्य व कास्य पदक - कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स

12,000/-

 

टिप- दर चार वर्षानी  आयोजित होणाऱ्या विश्वचषक /विश्व अजिंक्यपद स्पर्धा करीता सदरची योजना

      लागू राहील.

            याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons

            राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त श्री.ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
No comments