Breaking News

लॉकडावूनच्या नावाखाली नागरी दलित वस्ती सुधार योजनेमधील सर्व कामे निकृष्ट दर्जाचे न.प.अभियंत्याचे दुर्लक्ष


दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडे वंचितचे अजय सरवदे यांनी केली तक्रार  

बीड : नगर पालीका बीड येथे सन 2016-17, सन 2017-18, सन 2018-19, सन 2019-2020 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेचे अपूर्ण कामे झाली आहेत. सदरील कामे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे केले आहेत. दलितवस्ती अंतर्गत बरीच कामे न करता न.प.बीड येथील अभियंता यांना हाताशी धरून बिल उचलले आहेत.

सर्व कामे तज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज होणे महत्त्वाचे होते परंतु भ्रष्ट अभियंत्यामुळे अंदाजपत्रकानुसार कन्स्ट्रक्शने काम केले नाही. मंजूर निधी अनुसुचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या/प्रभाग 50% पेक्षा अधिक असलेल्या भागामध्ये खर्च करणे अपेक्षित असताना दलित वस्तीचे प्रशासकीय मान्यतेमध्ये 50% पेक्षा कमी लोकसंख्या/प्रभाग असलेल्या भागामध्ये कामे केली आहेत. प्रशासकीय मान्यतेत प्रस्तावित कामे तज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली झालेली नाहीत. कामाचे आदेश मिळाल्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये काम करणे असा आदेश असताना मुदतीत काम केले जात नाही. दलित वस्तीचे कामे निकृष्ट दर्जाचे करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

नगर परिषदेच्या अंतर्गत असंख्य कामे सुरू आहेत परंतु ते कोणत्या योजनेतून खर्च करण्यात येतो याची माहिती होत नाही तसेच प्रकरणी माहिती मागवली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. एकाही कामाच्या माहितीचे मार्गदर्शक फलक कामाच्या ठिकाणी लावलेलं नाही. सदरील प्रकरणाची मा.अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत तपासणी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद व अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.

पांढऱ्या कपड्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची पाठराखण करत टक्केवारी मिळवत आहे म्हणूनच प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. पाच दहा हजार रुपयांसाठी भ्रष्ट कामे झाकू नका त्यांना उघड करा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.

No comments