Breaking News

पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस तीन वर्ष सश्रम करावास व दंड

न्या.  सापटनेकर  यांचा महत्त्वपूर्ण निकाल

गौतम बचुटे । केज

शिक्षिका असलेल्या त्नीकडे बिअर शॉपी टाकण्यासाठी पैशाची मागणी करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अंबाजोगाई सत्र न्यायालयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि ४ हजार रु. चा दंड ठोठावला आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०:०० वा. सुमारास केज येथील शिक्षक कॉलनीत फिर्यादी मनिषा भ्र. श्रीधर गायकवाड, वय -४२ वर्ष, व्यवसाय - शिक्षीका, रा. दहीफळ वडमाऊली, ता. केज. जि. बीड ह.मु. शिक्षक कॉलनी, ता. केज  जि. बीड या घरी असतांना तिचा पती फिर्यादीचे पती श्रीधर पंढरी गायकवाड, वय -४२ वर्ष, रा. दहीफळ वडमाऊली, ता. केज, जि. बीड हा घरी आला व बिअर शॉपी टाकण्याकरीता पैसे दे, असे म्हणुन फिर्यादी सोबत भांडण केले. फिर्यादीने मनीषा हिने पैसे देण्यास नकार दिल्या नंतर तिचा पती श्रीधर याने घरातील रॉकेलची कँड घेऊन पत्नीला जिवंत जाळण्याचे उद्देशाने तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावण्याच्या प्रयत्न केला होता. त्या वेळी मनीषा हिने श्रीधर यास ढकलून दिले आणि पोलीस ठाणे केज गाठले. 

फिर्यादी मनीषा हिने दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाणे केज येथे गु.र.नं. २५३/२०१५  भा. दं. वि. ४०७ आणि ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला  होता.  या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाययक पोलीस निरीक्षक गाडेवाड यांच्याकडे देण्यात आला होता. तपासी अधिकारी यांनी प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून आवश्यक सर्व पुरावे हस्तगत केले. तपासी अधिकारी सपोनि गाडेवाड यांनी तपासाअंती आरोपी विरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर  न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले.

सदर प्रकरणाची सुनावणी मा.अपर सत्र न्यायालय १ ले, अंबाजोगाई यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती आरोपीता विरूध्द दिसून आलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर अपर सत्र न्यायालय १ ले, अंबाजोगाई श्रीमती एस. एस. सापटनेकर यांच्या न्यायालयाने आरोपीतास कलम ३०७ भा.दं.वि. मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व  ३ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त सश्रम करावास. तसेच कलम 4४९८ ( अ ) भा.दं.वि. मध्ये एक वर्ष सश्रम करावास व १ हजार रुपये दंड , दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील आर. एम. ढेले यांनी मांडली. तर पैरवीचे कामकाज पोउपनि अर्जुन चौधर यांनी पाहिले.
No comments