Breaking News

शिपायाने प्राध्यापकास बदाडले


दाैलावडगाव येथील महाविद्यालयातील प्रकार 

शेख कासम । कडा 

विद्यार्थ्यांना शिकवत असताना इंग्लिश विषयाच्या  प्राध्यापकास महाविद्यालयातील शिपायाने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत बदाडल्याचा प्रकार  दौलावडगावात (ता. आष्टी) येथे मंगळवारी (दि. १६) घडला. याप्रकरणी पीडित प्राध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील दाैलावडगाव येथील सरस्वती महाविद्यालयातील इंग्लिश विषयाचे प्राध्यापक संजय रामभाऊ क्षीरसागर मंगळवारी नेहमी प्रमाणे महाविद्यालयात आल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना कॉलेजमधील शिपाई क्लासमोर येऊन प्राध्यापक क्षीरसागर यांना आर्व्रिच्च भाषेत शिवीगाळ करत "तु काॅलेजमध्ये येऊ नकोस" असे मला प्राचार्यंनी सांगितले आहे. असे म्हणून विद्यार्थ्यांसमोर गचुरे धरुन मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्राध्यापक संजय रामभाऊ क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिपाई दत्ता फसले व प्राचार्य महेश दिनकर तांदळे यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात ३२३, ५०४, ५०६, ३४ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/७८० येवले करीत आहेत.

No comments