Breaking News

ग्रामीण भागात जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पायदळी


गावात ग्रामसेवक आणि तलाठीच हजर नसतात तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार कशी ?

गौतम बचुटे । केज 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक १५ मार्च पासून कठोर नियमावली लागू केलेली असताना केज तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र व्यावसायिक आणि नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश चक्क पायदळी तूडवत असल्याचे निदर्शनास येत आहे महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी मात्र ग्रामिण भागाकडे डोळेझाक करीत आहेत. 

या बाबतची माहिती अशी की दिनांक १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यातील दिवसें दिवस वाढणारे कोरोना बाधितांची वाढते रुग्ण  लक्षात घेता कोरूनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात हॉटेल्स, टपऱ्या या दिवसभर बंद करण्याचे आदेश दिले असून सायंकाळी ७:०० ते सकाळी ७:०० पर्यंत सर्वच व्यवहार बंद आणि संचार बंदीचा आदेश काढला आहे. 

या आदेशाची अमलबाजवणी व कार्यवहीचे आदेश पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना आहेत. मात्र ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामसेवक हेच हजर नसल्यामुळे हॉटेल्स व टपऱ्या खुलेआम सुरू असून संचार बंदीचा आदेश डावलून संचार बंदीच्या काळातही सर्व व्यवहार बिनबोभाट सुरू असतात. त्यामुळे गर्दी वाढून कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. मात्र याचे गांभीर्य ना निष्काळजीपणे गर्दी करणाऱ्या नागरिकांना ना नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांना ना कर्तव्याची जाण नसलेल्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना आहे. याचा अनिष्ठ परिणाम जिल्ह्यातील वाढते कोरोनावर होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.No comments