Breaking News

दयानंद व्यायाम शाळेच्या वतीने माऊली मुंडे यांचा सत्कार संपन्न

परळी : महर्षी दयानंद व्यायाम शाळेचे मल्ल ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यायाम शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

परळी वैजनाथ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा महर्षी दयानंद व्यायामशाळेचे पैलवान श्री.ज्ञानोबा(माऊली) मुंडे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संत भाऊ बाबा वंजारी सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून याचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेच्या वतीने ज्ञानोबा माऊली मुंडे यांचा क्रीडा तालुका समन्वयक बी.व्ही. अनकाडे, वसंतराव तिडके,प्रा.अतुल दुबे, प्रा.डॉ.जगदीश कावरे,किशोर केंद्रे,विजय मुंडे,मदन कराड, यशवंत कांबळे, यांच्या हस्ते  शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर नागराळे, दीपक गीते, सुदर्शन लिखे,शिवराज गीत्ते,वैजनाथ गीत्ते,राजाभाऊ मुंडे, स्वप्निल कांबळे, तेजस जाधव,आर्यन फड ,आरुष आचार्य अदि उपस्थित होते.

No comments