Breaking News

थोर पुरूषांनी समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित केले- प्रा पंजाब येडे

युवकांना महापुरुषांच्या विचारांची गरज 

बीड :  आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे. आपल्या घरातील थोरा-मोठ्यांचे आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करून स्वतःच्या बुद्धीने आणि आत्मविश्वासाने कार्य करणे गरजेचे असून वास्तवादी जीवन जगणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अण्णासाहेब पाटील यांनी जे बलिदान दिले. त्या बलिदानाचे स्मरण करून त्यांचे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करावेत असे प्रतिपादन प्रा. पंजाब येडे यांनी व्यक्त केले.

बीड येथील कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांचा शहीद दिन आणि कै. अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.पंजाब येडे हे बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष रमेश पोकळे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रमशक्ती कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गोरख शिंदे,प्रा.बन्सी हावळे,  प्रकाश शिंदे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.पंजाब येडे म्हणाले की, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांनी आपल्या तारुण्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देऊन शहीद झाले. तर कै.अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब,कष्टकरी,माथाडी कामगार यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य केले. आपल्या समाजाच्या विविध मागण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपले बलिदान दिले. या थोर पुरूषांच्या बलीदानाचे स्मरण करून आजच्या युवा पिढीने संघटीत होऊन आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले पाहिजे असेही प्रा पंजाब येडे म्हणाले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थाअध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राजगुरू,भगतसिंग,सुखदेव हे हसत हसत शहीद झाले. तसेच कै. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी आहोरात्र कार्य केले. समाजाच्या विविध मागण्यासाठी आपले बलिदान दिले. कै.अण्णासाहेब पाटील यांनी जो आम्हाला स्वाभिमान शिकवला तोच स्वाभिमानी बाणा घेऊन आपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहोत. आजच्या युवकांनी थोर पुरुषांचे विचार आत्मसात करून कार्य करावे असे देखील रमेश पोकळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. यावेळी श्री गोरख शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बप्पासाहेब हावळे यांनी केले. तर आभार प्रा. विजय दहिवाळ यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.बन्‍सी हावळे, प्रकाश शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण थापडे,ज्ञानेश्वरकाका बांडे, संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे, प्रशासकीय अधिकारी सावंत सर, प्रा सुरेश कसबे,शरद पोकळे,गाढवे सर,सुधिर केंगार,नारद मॅडम,बहिर मॅडम, सचिन चौरे आदी उपस्थित होते.
No comments