Breaking News

पाच पेक्षा जास्त कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येणारा परिसर तात्काळ कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात यावा--जिल्हाधिकारी


तहसिलदारांनी नियमितपणे कन्टेनमेंट झोनबाबत आदेशांची कार्यवाही करण्याचे दिले निर्देश

बीड : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कन्टेनमेंट झोन तात्काळ जाहीर करण्यासाठी ज्या ठिकाणच्या १०० मीटर परिसरात ५ किंवा ५ पेक्षा जास्त कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येतील असा परिसर तात्काळ कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात यावे असे  निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्देश जारी केले आहेत.

यापूर्वीच्या दि.१३ आॅगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये तालुकास्तरावर कन्टेनमेंट झोन (Containment Zone ) आदेश व कालावधी संपल्यानंतर नियमाप्रमाणे शिथिल आदेश देण्याबाबत तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार तहसिलदार यांनी नियमितपणे कन्टेनमेंट झोनबाबत आदेशाची कार्यवाही करण्यासाठी खालील निर्देश दिले आहेत.

१. शहरी भागातील स्थाननिश्चिती Containment Zone बाबत कार्यवाही मुख्याधिकारी नगर परिषद यांनी करावी

आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कळवावे यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक यांची मदत प्रत्येक वेळी घ्यावी.

२. ग्रामीण भागातील स्थान निश्चिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी Containment Zone बाबत कार्यवाही करावी.

३. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसिलदार यांना विनाविलंब द्यावी. यानुसार तहसिलदार यांनी Containment Zone आदेश व कालावधी संपल्यानंतर नियमाप्रमाणे शिथिल आदेश नियमित देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

No comments