Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल

गौतम बचुटे । केज 

जिल्ह्यातील हॉटेल्स व टपऱ्या बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश धुडकावून केज शहरातील टपऱ्या व हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविल्या प्रकरणी केज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, जिल्हाधिकारी बीड यांनी दि. १३ मार्च रोजी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश काढला आहे. त्या नुसार दि. १५ मार्च पासून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या व हॉटेल्स बंद करण्याचा आदेश असताना केज शहारातील सात टपऱ्या व एक हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविली असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच; पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब काळे व अशोक नामदास, गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते यांना दि. १५ मार्च रोजी केज शहरातील सहा पानटपऱ्या व एक हॉटेल हे बंदी आदेश डावलून उघडे असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. 

त्या नुसार सरकार तर्फे पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात श्रीकांत नंदकिशोर सोनवणे, सचिन आनंदराव सत्वधर, शेख सलीम सत्तार, आसेफ इसाक तांबोळी, अलताफ मोहम्मद हुसेन, महादेव उत्तरेश्वर देशमाने या सहा टपऱ्या चालक आणि सय्यद मोहसीन शाकेर या हॉटेल चालकाला विरुध्द गु. र. नं. १२१/२०२१ भा. द. वि. १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) साथरोग प्रतिबंधक कायदा अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.No comments