Breaking News

ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी - डॉ.याज्ञिक रणखांब


पहिल्याच दिवशी ६८ ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड

ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन पात्रुड  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.याज्ञिक रणखांब यांनी बुधवारी दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण शुभारंभ प्रसंगी केले आहे. ६८ ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. 

दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्रात कोरोना विषाणू प्रतिबंधक लस बुधवार पासुन देण्यात येत आहे. यावेळी श्री रणखांब बोलत होते. ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक शंका-कुशंका असल्याने नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.हि लस अत्यंत सुरक्षित असुन कोरोना आजारापासून आपला बचाव करते तेंव्हा कुठलीही शंका न बाळगता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे असे अवाहन डाॅ रणखांब यांनी केले आहे. आठवड्यातील तिन  दिवस दिंद्रुड येथे लस देण्यात येणार असुन त्याचा सुभारंभ करण्यासाठी दिंद्रुड नगरीचे सरपंच अजय कोमटवार, ग्राम पंचायत सदस्य राजेभाऊ कटारे, पत्रकार बाबासाहेब देशमाने सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ.याज्ञिक रणखांब,समुदाय आरोग्य  अधिकारी डाॅ स्वाती काशिद, मुख्य आरोग्य सेविका श्रीमती वर्षा पवार सिस्टर, आरोग्य सहाय्यक बी जे ठोंबरे,आरोग्यसेविका किर्ती सोळंके, सह आशावर्कर मंदा कसबे देशमाने,शितल सिरसे, सविता काटे, मनोरमा लाड आदी उपस्थित होते.

No comments