Breaking News

राजमुद्रा संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम संपन्न


मराठवाडा प्रमुख महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे होते औचित्य

बीड :  राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवारी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमात संघटनेचे पदाधिकारी व इतर तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारी राजमुद्रा संघटनेची ओळख असून संघटनेतील सदस्य सामाजिक कार्य करण्यासाठी नेतमीच तत्पर असतात. राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 51 तरुणांनी रक्तदान केले तर 25 गोरगरीब कुटूंबांना दोन महिना पुरेल ऐवढ्या किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना 25 डझन वह्या व साहित्य वाटप करण्यात आले. कडक उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे रत्याच्या कडेला काम करणार्‍या लहान व्यवसायिकांना उन्हापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी राजमुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश शेळके, रंजित पिंगळे, जिल्हाध्यक्ष सचिन पवार, वाहतूक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे, नितीन सपकाळ, युवक जिल्हाध्यक्ष बबलु सावंत, उमेश पवार, सुनील ठोंबरे, गणेश माने, सचिन सिरसाट, विजय चाळक, भाऊसाहेब चव्हाण, शाम सपकाळ, संदीप बुधनर, तुषार जोगदंड, अशोक हारणमारे, बळी पिंगळे, नागेश सुतार, नितीन पिवाळ, पप्पु ठोंबरे, मंगेश डोळस, सोनु ठोंबरे, शुभम दळवी, सचिन जाधव, विशाल काळे, महेंद्र शिंदे, सोनु सोनकांबळे, विशाल सोनकांबळे, विशाल शेळके, उत्कर्ष घाटे, शेख राजु, शेख इमतियाज, शेख कलीम, शक्ती कुलथे, धनंजय जाधव, सोनु व्यवहारे, अजय पवळ, कृष्णा देवकुळ, नाना धजगुडे, गणेश टाटोर, अरुण साबळे, गणेश भोसले, नरेश जाधव, राजु भोसले, योगेश उगले, योगेश चंदनशीव, कृष्णा बरडे, अनिकेत घोरड, अक्षय खोले, रोहिदास जाधव, लखन दळवी, विलास जाधव, अशोक धापसे, प्रदीप वाघ, राहुल ओव्हळ, अमित गायकवाड, अमोल उपासे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राजमुद्रा संघटनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे म्हणाले की, आजची तरुण मंडळी वाढदिवस म्हटले की ढोल-ताशे, डीजे लाऊन रस्त्यावर केक कापण्यास प्राधान्य देतात. मात्र आजही राजमुद्रा सामाजिक संघटनेत कार्यरत असणारे तरुण पदाधिकारी त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यानेच साजरा करत आहेत. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम घेतले जातील असे पिंगळे म्हणाले.

No comments