Breaking News

वाळूचे ट्रॅक्टर का अडवीतोस म्हणून एकास लोखंडी गजाने गंभीर मारहाण करून दुखापत


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात अनेक ठिकाणी अवैद्य वाळू उपसा सुरू असून वाळूचे ट्रॅक्टर का अडवितोस म्हणून एकास लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मार्च सोमवार रोजी दुपारी २:०० वा. सोमनाथ जनार्धन कापरे यास अशी माहिती मिळाली की त्याच्या भाऊ अण्णासाहेब कापरे यास अतुल देशमुख, रवींद्र भोसले व हरी या तिघांनी दारू पी नाहीतर आम्हाला दारू पाज या कारणा वरून मारहाण झाल्याचे समजले. त्या वरून सोमनाथ कापरे हा हनुमंत पिंप्री फाट्यावरील कमानी जवळ गेला आणि त्याने अतुल देशमुख, रवींद्र भोसले व हरी यास त्याच्या भावाला मारहाण का केली ? असे विचारले असता अतुल अंकुशराव देशमुख याने सोमनाथ कापरे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जेसीबी चालक हरी याने काठीने मारून हात फ्रँकचर केला आणि रवींद्र भोसले याने लोखंडी गज डोक्यात मारून गंभीर इजा केली. हे तिघे सोमनाथ कापरे यास म्हणाले की, तू त्यांचे वाळूचे ट्रॅक्टर व जेसीबी कशी काय अडवितोस? असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सोमनाथ कापरे यांच्या फिर्यादी वरून दि. २९ मार्च रोजी केज पोलीस स्टेशनला अतुल देशमुख, रवी भोसले व हरी सर्व रा वरपगाव ता. केज यांच्या विरुद्ध गु. र. नं. १४१/२०२१ भा. दं. वि. ३२६, ३२५, ३२३,  ५०४, ५०६  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान केज तालुक्यात अनेक ठिकाणी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असून महसूल यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे दिसून येते.

No comments