Breaking News

आ.विनायकराव मेटे यांच्या आमदार निधीतून मौजे चऱ्हाटा येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन

बीड  : आ.विनायकराजी मेटे यांच्या आमदार निधीतून मौजे चऱ्हाटा ता.जि.बीड येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज व ह.भ.प.भक्तीदास महाराज शिंदे यांच्या हस्ते व रामहरी भैय्या मेटे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

याप्रसंगी गावातील व परिसरातील नागरीकांची आ.मेटे साहेबांचे आभार मानत यापुढे ही असेच सामाजिक कार्यात आपण आग्रेसर रहाल अशी आशा व्यक्त केले. बीड जिल्ह्याचा सर्वांगिन विकास व्हावा हा ध्यास मनाशी बाळगून आ.मेटे साहेब हे सतत अनेक योजनांमधून लोकहिताच्या कामासाठी सतत अग्रेसर असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज ह.भ.प.शिवाजी महाराज व भक्तीदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी शिवसंग्रामचे नेते सचिन कोटूळे, नितीन आगवान, संदीप उबाळे, सरपंच हनुमान ससाने, बबन उबाळे, ब्रम्हदेव शेळके, पोपट उबाळे, मा.उपसरपंच महादेव उबाळे, ग्रा.प.सदस्य जगदीश उबाळे, भरत उबाळे, संदीप उबाळे, दत्ता उबाळे, मुकुंद उबाळे सह गावातील मोठ्या प्रमाणात नागरीक हजर होते. 
No comments