Breaking News

खबरदार मास्क लावा नाहीतर दंड भरवाच लागेल....!

तहसीलदारांच्या हातात दंडाची काठी ; लोकांना शिस्त लावण्यासाठी 

तहसीलदार, नायब तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी उतरले रस्त्यावर

गौतम बचुटे । केज  

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक लोक तोंडावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे फिरत असल्याचे निदर्शनास येताच; केजचे दबंग तहसीलदार मेंढके हे फौज फाट्यानिशी रस्त्यावर उतरले असून विना मास्क फिरणाऱ्या हिंडफीऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे.

कोरोना काळात केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी अत्यंत चांगले काम केलेले आहे लोकांना शिस्त लावण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात आता पुन्हा आणखी कोरोनाचे संकट घोंगावत आहे. तरी देखील अनेक नागरिक निष्काळजीपणे तोंडावर मास्क न लावता किंवा सोशल डिस्टनसिंग न पाळता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. तहसीलदार दुलाजी मेंढके हे हातात नियम आणि कायद्यांचा दंडुका हातात घेऊन उतरले आहेत. अनेक वाहनचालक त्यात दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचारी हे विना मास्क आढळताच त्यांना दंड देऊन समज दिली आहे. 

या वेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, हजारे, नगर पंचायतचे पथक आणि पोलीस कर्मचारी बाळू अहंकारे व डोईफोडे आदी पथकात होते.

लोकांनी नियमांचे पालन करावे अनावश्यक गर्दी टाळावी व तोंडावर मास्क लावावेत आणि सॅनिटायझर वापर करावा.

- दुलाजी मेंढके तहसीलदार, केज

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येत असून नियमाप्रमाणे लसीचा डोस दिला जात आहे.

 डॉ. विकास आठवले,

    केज तालुका आरोग्य अधिकारी

No comments