Breaking News

त्या बलात्कार प्रकरणातील आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील एका गावात घरी कोणी नसल्याची संधी साधून एका नराधामाने एका विधवेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची घटना घडली आहे. पोलीसांनी  गुन्हा दाखल होताच आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी १०:०० वा. च्या सुमारास एक विधवा महिला ही तिच्या घरांमध्ये तिच्या मुलासह असताना नारायण तांदळे या नराधमाने तिच्या घरात शिरून लहान मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. 

हा धक्का सहन न झाल्यामुळे सदर महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. उपचार केल्या नंतर पिडीत विधवा महिला ही दि. ४ मार्च २०२१ रोजी केज पोलीस स्टेशनला हजर होऊन तिने तक्रार दिली. पिडितेच्या तक्रारी नुसार गु. र. नं. १०३/२०२१ भा. दं. वि. ३७६ आणि ५०४ नुसार नारायण तांदळे यांच्या विरुद्ध बलात्कारासह पीडितेला जिवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तात्काळ आरोपी ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. दरम्यान दि. ४ मार्च रोजी आरोपीस केज न्यायालया समोर हजर केले असता आरोपीला दि.७ मार्च पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments