Breaking News

बीड जिल्हा कोविड रुग्णालय व सेंटर मध्ये आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार - आम आदमी पार्टी


जिल्हा शल्यचिकित्सक काय करत आहेत ? - शहराध्यक्ष सय्यद सादेक

बीड :  आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ सर्वत्र दिसून येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांचे काहीही कंट्रोल सध्या आरोग्य व्यवस्थेवर दिसत नाही. आम आदमी पार्टी बीडने लॉकडाऊन व उपचार संबंधी हेल्पलाईन जाहीर केली होती. काल सकाळपासूनच या हेल्पलाईनच्या क्रमांकावर फोन यायला सुरू झाले. एका रुग्णाला तातडीने ऑपरेशन करायचे होते व ऑपरेशन पूर्वी कोरोना तपासणी करायला सांगितल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तारीख 25 ला तपासणी केली गेली असताना रिपोर्ट दिला नाही म्हणून आजपर्यंत रुग्णाला विना ऑपरेशन खाजगी दवाखान्यात राहावे लागले, त्याचे बिल भरावे लागत होते. रुग्णाच्या लतींगे नामक नातेवाईकांने ही बाब आम्हाला फोन करून सांगितली. विषय गंभीर व रिपोरी तात्काळ आवश्यक असल्याने मी व आम आदमीचे शहराध्यक्ष सादेक भाई तात्काळ दवाखान्यात पोहोचलो. 3 दिवसांपासून रिपोर्ट नाही देणारे राज्यातली एकमेव आरोग्य यंत्रणा फक्त बीडची आहे.


 संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने सर्व विभागात सापडल्यानंतर रिपोर्ट मिळाला. असे दुर्दैवी प्रकार हे सर्वांसोबत घडत आहेत. येथे येणाऱ्या लोकांसोबत कर्मचारी योग्य व्यवहार करत नाहीत. यावेळी अंतर, मास्क, गर्दी, नियम न पाळल्यामुळे या सगळ्या सोबत गुण्यागोविंदाने कोरोना पसरतो मात्र याचे काहीएक देणेघेणे प्रशासनाला नाही. कोविड सेंटर मधून फोन येत आहेत सुविधा चांगल्या नाहीत, बाथरूम स्वच्छ नसतात, डॉक्टर लक्ष देत नाहीत, कुणी काय करत आहे याचा मेळ नाही. आरोग्य विभागाने लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेला सेवा द्यावी असे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव जमाले यांनी मागणी केली आहे.
No comments