Breaking News

केजमध्ये कृषि कायद्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे


गौतम बचुटे । केज 

केज येथे केंद्र सरकाच्या कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी केज तहसील कार्यालया समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन  करण्यात आले.

या बाबतची माहीती अशी की, केंद्र सरकारने शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विरोधात उत्पादने व्यापार आणि वाणिज्य संदर्भात प्रोत्साहन व सुविधा कायदा. आश्वासन आणि कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा हे काळे कायदा असल्याचा उल्लेख करीत केज तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे आणि जिल्हा प्रवक्ते भगवंत वायबसे यांच्या नेतृत्वाखाली युवानेते निलेश साखरे, गोरख गायकवाड, उत्तम वाघमारे, अजय भांगे, विशाल धिरे, नवनाथ पौळ, गौरीताई शिंदे, अमोल हजारे, राणी करपे आणि जेष्ठ नेते गंगाधर सिरसट हे उपस्थित होते.

No comments