Breaking News

शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी नगर पालिकेच्या इमारतीला कंदील लावून केला धिक्कार


बीड शहरातील पथदिवे पंधरा दिवसापासून बंद, शिवसंग्रामचे दत्ता गायकवाड यांचे कार्यकर्त्यांसह अनोखं आंदोलन  

बीड :  नगर परिषदेकडे वीज बील थकविल्याने  महावितरणने शहरातील रस्त्यावरील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने शहरात अंधार पसरलाय. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहराला अंधारात ठेवणाऱ्या पालिकेला शिवसंग्रामचे दत्ता गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या इमारतीला कंदील लावून जोरदार घोषणाबाजी करून राजकर्त्यांसह पालिका प्रशासनासह  धिक्कार केला.


व्हीडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड पालिकेकडे महावितरणचे अंदाजित १.५० कोटी रुपये थकीत वीज बिलापोटी शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये- जा करतांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच शहरातील विविध भागात विकास कामे करण्यात येत आहे.  अंधारामुळे वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यातील खड्डे दिसत नसल्याने नागरिक त्यात पडून जखमी होऊ लागली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडण्याची संभवना नाकारता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पथदिवे पूर्ववत चालू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसंग्रामचे युवानेते दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे, अनोखं आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला असून शहरातील पथदिवे पूर्ववत चालू करण्यात आली नाहीतर शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने आ. विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्रामचे युवक नेते दत्ता गायकवाड, शहर अध्यक्ष लक्ष्मण ढवळे यांनी दिलाय. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस सुहास आबा पाटील शहराध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे आबा पाटील, शेषेराव तांबे,  प्रसिध्दी प्रमुख मनोज जाधव,शहर युवक अध्यक्ष प्रशांत डोरले,  कैलास शेजुळ, जकिर हुसेन, अमजद पठाण, अझहर भाई शेख, शेख आबेद, नितीन आगवान, गणेश धोंडरे सर, सुशांत सत्रलकर, इम्रान जहागीरदार, प्रकाश जाधव, शैलेश, सुरवासे, सलमान अली, अक्षय माने, सौरभ तांबे, प्रेम धयाजे, तुषार शेंगदे, समीर शेख आदी शिवसंग्राम पदाधिकारी व युवक सहभागी झाले होते.

No comments