Breaking News

महावितरणच्या अडमुठ्या धोरणामुळे अनेकांच्या घरात अंधार वसूलीचा तगादा खपवून घेतला जाणार नाही- अ‍ॅड.संगिता चव्हाण


बीड
  : गेल्यावर्षीचा संंपूर्ण काळ कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये गेला यामुळे अनेकांच्या आर्थिक व्यवस्थेची घडी विस्कटलेली असून ती अद्यापही बसलेली नसतांनाही महावितरण विभागाकडून विजबील भरण्याचा तगादा लावत कनेक्शन तोडण्यात येत आहे. महावितरणच्या अडमुठ्या धोरणामुळे अनेकांच्या घरात अंधार झाला असून महावितरणने सर्वसामान्यांना काही प्रमाणात सुट देत टप्याटप्याने विजबीलाचा भरणा करण्याची विनंती करावी त्यांनी लावेली हेकेखोरी आणि अडमुठेपणाने वसुलीचा तगादा खपवून घेताला जाणार नसल्याचा इशारा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी दिला आहे. 

मागील संपूर्ण वर्ष कोरोनाचा थैमान असल्याने अनेकांचे हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. यातून कसेबसे सावरत आता कुठी थारा लागत असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेकांना जगणे  जिकरिचे असतांना महावितरण विभागाकडून विद्यूत कनेक्शन कट करत वसूली करण्यात येत आहे. 

या संसर्गामुळे अनेक उद्योग व्यवसाय तसेच हातावर पोट भरणार्‍या नागरिकांनासह गोर-गरिब जनतेचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपली उपजिविका भागविणे सध्या कठीण झाले असुन अशा गंभीर परिस्थिती मध्ये महाविरण विभाग सवतीच्या लेकरा सारख वागत संकटात साथ देण्या ऐवजी वसूलीचा तगादा लावला जात आहे. लॉकडाऊन काळामध्ये नागरिक घरात असल्याने उत्पन्नाचे सोर्स संपूर्णपणे बंद होते. यामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली होती. आजही ती घडी बसलेली नसतांना महावितरण विभाग नागरिकांकडून खाजगी सावकराप्रमाणे विजबिल वसूली करत आहे. यामुळे अनेकांच्या घरात अंधार पसला असून महाविरण विभागाने लावलेला वसूलीचा तगादा खपवून घेतला जाणार नसल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांना इशारा दिला आहे.


No comments