Breaking News

पत्रकार सय्यद फ़ेरोज़ अली आणि समीर काझी सत्कारीत

बीड : येथील पत्रकार सय्यद फ़ेरोज़ अली आणि समीर काझी यांची युवा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याने त्यांचा एआयएमआयएम पक्षाचे युवा नेते सय्यद इलयास यांनी मुहम्मदिया कॉलनी येथे हृदयी सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे जिल्हा प्रवक्ता हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.

      महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथील युवा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने बीड शहरातील सायं. दैनिक आमचा अभिमान चे सहसंपादक सय्यद फ़ेरोज़ अली यांची  पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागाध्यक्षपदी आणि सा. बीड प्रसार चे संपादक समीर काझी यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने एआयएमआयएम पक्षाचे युवा नेते सय्यद इलयास यांनी त्यांचा मुहम्मदिया कॉलनी येथे हार व समान नागरी कायद्याची पुस्तके देऊन हृदयी सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा प्रवक्ता हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील अन्य तरुण व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

No comments