Breaking News

एआयएमआयएम चा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

 


बीड : येथील एआयएमआयएम पक्षाच्या मुख्य कार्यालयात पक्षाचा 63 वा वर्धापन दिन पक्षाचा झेंडा फडकावून मोठ्या थाटात संपन्न झाला. 
      या विषयी सविस्तर वृत्त असे की, एआयएमआयएम हा पक्ष मौलवी अब्दुल वाहिद अली ओवैसी यांनी 2 मार्च 1957 रोजी स्थापन केला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र सालारे मिल्लत सुलतान सलाहुद्दिन ओवैसी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. त्यांच्यानंतर आजमीतिला पक्षाचे खासदार आणि जनतेसाठी लोकसभेमध्ये धडाडणारी तोफ म्हणून सर्व परिचित असलेले बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी समर्थपणे सांभाळीत आहे.
 पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या 63 वर्षात राजकारणात तसेच समाजकारणात सतत सक्रिय असणारा पक्ष म्हणून एआयएमआयएम पक्ष आपली वाटचाल यशस्वीपणे करीत आहे. या वाटचालीमध्ये पक्षाला आता मोठ्या प्रमाणात जनसमर्थन ही लाभत आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे देशाच्या संसदेत मुलुख मैदानी तोफ म्हणून गाजत आहेत. 
अशा या पक्षाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा पक्ष कार्यालय मध्ये जिल्हाध्यक्ष एडवोकेट शेख शफीक भाऊ यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवून ध्वजारोहन करण्याचा कार्यक्रम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज लाला यांच्या आदेशानुसार पक्षाचा झेंडा फडकवून सलामी देण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट शफिक भाऊ यांनी म्हटले की, पक्षाच्या ध्यानीमनी नसताना काहींनी आमच्या पक्षाला फक्त एका समाजापुरता मर्यादित असल्याचा ठपका ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु जसे जसे दिवस जात आहे तस तसे सर्व समाजातील मतदार जनताच मतपेटीतून दाखवून देत आहे की, आमचा पक्ष हा फक्त एका समाजापुरता मर्यादित नसून सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी असलेला पक्ष आहे. याचा अनुभव आता विरोधकांना सुद्धा येत आहे. देशामध्ये ज्या ज्या राज्यात विविध निवडणुका पार पडत आहे त्या त्या निवडणूकांमध्ये पक्षाच्या विजयाचा निकाल सर्वांना दिसून येत आहे. 
नुकतेच बिहार राज्यात पक्षाचे पाच आमदार निवडून आले. तर गुजरातच्या अहमदाबादमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आलेत आणि हे निवडून आलेले सर्व सदस्य फक्त एका समाजाचे नसून सर्व समाजातील आहेत. या सर्व निकालांवरून जनतेनेच आपल्या मतदानाद्वारे विरोधकांना तोंडघशी पाडल्याचे सर्वजण पाहत आहे. यापुढे आपल्या बीड जिल्ह्यात सुद्धा आपणा सर्वांना कंबर कसून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने झटकून कामाला लागावे आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार जास्तीत जास्त संख्येत निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. यासाठी सर्वांनी एक दिलाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस हाजी अय्युब पठाण, जिल्हा प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, नगरसेवक शेख मतीन भैया, ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, नगरसेवक अझहर मोमीन, नगरसेवक हाफिज अश्फाक, खन्ना भैय्या, शेख शाकेर, अदनान खान, रहेमत पठाण, परवेज खान, सलमान शेख, फारुख खान, फैय्याज खान, शाहनवाज खान, युवा नेता सय्यद इलयास, मुन्ना भाई, नईम मेंबर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सय्यद सैफ उर्फ लालू यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
No comments