Breaking News

सर्व व्यावसायिक, नागरिकांनी अॅंन्टिजन टेस्ट करून घेणे बंधनकारक - अजय कोमटवार


दिंद्रुड : दिंद्रुड ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी अॅन्टीजन तपासणी करणे बंधन कारक असून दिंद्रुड येथे आज दि १५ रोजी तपासणी करण्यात येणार आहेत, तरी दिंद्रुड येथील सर्व व्यावसायिकांनी या प्रसंगी आपआपली अॅन्टीजन तपासणी करावी असे आवाहन दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार यांनी केले आहे. 

कोरोना विषाणु संसर्गजन्य आजार (कोविड१९) ची अँन्टिजन तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड अंतर्गत आज दिंद्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरु करण्यात येणार असून येथील सर्व खाजगी व्यावसायिक तसेच बाहेरगावाहून आलेले नागरिक ज्यांना सर्दी-खोकला असे आजार आहेत अशा सर्वांनी ही तपासणी करणे बंधनकारक असल्याचे दिंद्रुड ग्रामपंचायतचे सरपंच अजय कोमटवार यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे सांगितले आहे.  कोरोना विषाणू संसर्ग ग्रामीण भागात फोफावत आहे. जिल्हाधिकारी जगताप यांच्या आदेशानुसार सर्व दिंद्रुड व परिसरातील नागरिकांनी कोविड १९ ची अॅंन्टिजन तपासणी करून घ्यावी असे आवाहन सरपंच तथा ग्रामपंचायत दिंद्रुड मार्फत सुचित करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व व्यावसायिकांनी अॅन्टीजन तपासणी करणे बंधनकारक असुन जे दुकानदार व व्यापारी अॅन्टीजन तपासणी करणार नाहीत त्यांची दुकान सिल करण्यात येणार असुन पुढील होणारी वाताहत टाळण्यासाठी सर्वांनी अॅन्टीजन तपासणी करुन घेण्याचे आवाहन दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केले आहे.
No comments