Breaking News

अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कार्यवाही : मुद्देमालासह एक जण ताब्यात

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील एकुरका येथे पोलिसांनी आज टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ४:००  वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील एकुरका शिवारातील गट नंबर ५० मध्ये घरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे, सिद्धार्थ डोईफोडे आणि अशोक नामदास यांच्या पथकाने अचानक छापा टाकून देशी दारू विक्री करत असलेला एक इसम नामे अरुण ज्ञानोबा कोकाटे वय ४५ वर्ष याला बॉबी संत्रा देशी दारुच्या २४१ बाटल्यासह ज्याची किंमत ६ हजार २६६ रु. आहे असा मुद्देमाल ताब्यात घेतले. 

पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास हे करीत आहेत.
No comments